इलोन मस्क पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

3

पुणे, १ जून २०२३ : जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरसारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्लाच्या सीईओने फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकले आहे, जे आतापर्यंत अव्वल स्थानावर होते. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार या वर्षी अव्वल स्थानासाठी स्पर्धा होती. कधी इलॉन मस्क तर कधी बर्नार्ड अर्नॉल्ट वरच्या स्थानावर होते. बर्नार्ड अर्नॉल्ट या वर्षात बराच काळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले आणि एलोन मस्क दुसऱ्या स्थानावर होते. गेल्या २४ तासांत इलॉन मस्कची नेट वर्थ $१.९८ बिलियनने वाढली आहे, तर फ्रेंच उद्योगपती अर्नॉल्टला $५.३५ बिलियनचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एलोन मस्कच्या एकूण संपत्तीत $१.९८ अब्जच्या वाढीनंतर ती $१९२ बिलियन झाली आहे. मालमत्तेतील या तेजीमुळे ते अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर पोहोचले असून पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट त्यांच्या डोक्यावर बसला आहे. दुसरीकडे, बर्नार्ड अर्नॉल्टबद्दल बोलायचे तर, $५.२५ अब्जच्या घसरणीनंतर त्यांची नेट वर्थ $१८७ बिलियनवर आली आहे. एवढ्या संपत्तीसह ते आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

बर्नार्ड अर्नॉल्ट हे ७४ वर्षांचे फ्रेंच बिझनेस टायकून आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये मस्कला मागे टाकून ते पहिल्यांदाच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले होते. अर्नॉल्ट यांनी LVMH ची स्थापना केली. ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेनुसार, चीनच्या महत्त्वाच्या बाजारपेठेत झालेल्या आथिर्क मंदीमुळे लक्झरी क्षेत्र खाली घसरले. अशा परिस्थितीत एप्रिलपासून LVMH चे शेअर्स सुमारे १० टक्क्यांनी घसरले गेले.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा