इलॉन मस्क परफ्युम व्यवसायात!

नवी दिल्ली, १३ ऑक्टोंबर २०२२ : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसेक्स कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क आता परफ्युम व्यवसायात उतरले आहेत. Burnt Hair नावाचा ब्रँड त्यांनी बाजारात आणला असून त्याची किंमती ८,४०० रुपये आहे.

एलॉन मस्क नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. अलिकडे त्यांची ट्विटर डील चर्चेत आहे. त्यांनी आधी ट्विटर विकत घेण्याची घोषणा केली, नंतर ही ट्विटर डील मोडली. त्यानंतर आता पुन्हा मस्क ट्विटर खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. एलॉन मस्क यांचे ट्विट अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दरम्यान हा बर्न्ट हेअर परफ्यूम ‘द बोरींग कंपनी’ या ब्रंडचा आहे. ‘द बोरींग कंपनी’ ही एलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी आहे. ‘द बोरींग कंपनी’ अमेरिकन टनल बनवणारी कंपनी आहे. दरम्यान या कंपनीने एक परफ्यूम लाँच केला आहे. या परफ्यूमची जाहिरात करण्यासाठी एलॉन मस्क यांनी नवीन मार्ग शोधला आहे. म्हणून त्यांनी स्वत:ला परफ्यूम सेल्समन म्हटलं आहे.
मस्क यांनी स्वतः आपल्या ट्विटरवरुन याची घोषणा केली असून त्यांनी आपल्या ट्विटरच्या बायोमध्ये बदल करत परफ्युम सेल्समन असं केलं आहे. तसेच आपल्या Burnt Hair नामक परफ्युम ब्रँडला पृथ्वीवरील सर्वात छान अत्तर असल्याची कॅप्शनही त्यानं दिलं आहे.

मस्क यांनी काय म्हटलंय?

मस्क यांनी याची सविस्तर माहिती देताना म्हटलं की, अत्तराचा व्यवसाय हा टाळता येणारा नाही, त्यामुळं मी इतके दिवस कसा दूर राहिलो? आमचा परफ्युम तुम्ही क्रिप्टो करन्सीद्वारे देखील विकत घेऊ शकता. तसेच डॉलरच्या स्वरुपात तुम्ही याचे पैसे देऊ शकता. या परफ्युमची किंमत १०० अमेरिकन डॉलर आहे. याच्या १०,००० बॉटलची यापूर्वीच विक्री देखील झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मस्क यांनी म्हटलं होतं की, बोअरिंग कंपनी लवकरच पुरुषांसाठी सेंट लॉन्च करणार आहे. हा सेंट त्यांना गर्दीतही उभं राहण्यास मदत करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा