इलॉन मस्क चढणार कोर्टाची पायरी

यूएस,२० जुलै २०२२: इलॉन मस्क यांना ट्विटरने धक्का दिल्याने आता इलॉन मस्क यांना अखेर कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये ही सुनावणी होणार असून तब्बल ४४ अब्ज डॉलरच्या करारामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसत आहे.

डेलावेअर न्यायालयाने ट्विटरच्या रद्द करारावरील इलॉन मस्क यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. इलॉन मस्क ट्विटर विकत घेणार असं म्हणत असताना अचानक हा करार रद्द झाला. त्यामुळे आता ट्विटरने इलॉन मस्क यांना ४४ अब्ज डॉलरचा करार पूर्ण करण्यास ट्विटर कंपनीची ट्विटर इंक कंपनी भाग पाडू इच्छित आहे. याचसाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.

यावेळी डेलावेअर न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश कॅथलिन मॅककॉर्मिक यांनी सांगितलं की दोन्ही पक्षांना खटल्यासाठी वेळापत्रक तयार करण्यास सांगितले असून त्यानुसार होणारा विलंब यामुळे टाळता येईल. या कारवाईमध्ये विलंब झाल्याने ट्विटरचे नुकसानही होऊ शकते, असा धोका ट्विटरला होऊ शकतो, असेही न्यायालयाने सांगितले. तसेच दोन्ही पक्ष हे खटल्याची कारवाई शक्य तितक्या सक्षमपणे हाताळू शकते, असेही न्यायालयाने सांगितले.

इलॉन मस्क यांना ट्विटरचा हा सौदा महागात पडू शकतो. ज्यात त्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याचे कारण ट्विटर हँन्डल चा करार तर संपुष्टात आला आहे. पण या करारामुळे होणाऱ्या न्यायालयीन कारवाईला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच जर हा खटला ते हरले, तर त्यामुळे होणारे नुकसान हे जास्त प्रमाणात असून तेल गेले, तूप गेले हाती आले धुपाटणे, अशी इलॉन मस्क यांची अवस्था होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा