बारा कोटी अठरा लाखांचा अपहार; ‘मंठा’ चे तत्कालीन सीईओसह चौदा जण अडचणीत

जालना, ६ सप्टेंबर २०२२: जालना जिल्ह्यातील मंठा अर्बन बँकेने नियमबाह्य पध्दतीने व्यवहार, नियमबाह्य कर्ज वाटप करुन १२कोटी १८ लाख ४ हजार ४१६ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप लेखा परीक्षण अहवालाच्या विषेश अहवालात ठेवण्यात आला आहे. यामुळं तत्कालीन सीईओंसह चौदा जणांविरुध्द गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष लेखा परीक्षण एस. आर. कांबळे यांनी बँकेचे व्यवहारांचे परीक्षण करुन वीस जूनला हा अहवाल सादर केला आहे. बँकेचे तत्कालीन मुख्य अधिकारी, संबंधीत शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफीसर व लिपीक यांनी संगनमत करुन बँकेची फसवणूक करुन हा अपहार केल्याचा संशय आहे.

जिल्हा उपनिबंधकांनी लेखा परीक्षकांना संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या बाबत परवानगी ही दिली असल्याची माहिती समोर आली आहे‌. त्यामुळें तत्कालीन सीईआओंसह चौदा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे‌.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा