अमेरिकेतून भारतात येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे स्वीडनमध्ये इमर्जन्सी लँडिंग

स्टॉकहोम, २२ फेब्रुवारी २०२३ :एअर इंडिया नेवार्क (यूएस) ते दिल्ली विमानाचे (AI106) सुमारे ३०० प्रवाशांसह स्वीडनच्या स्टॉकहोम विमानतळावर बुधवारी तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेची माहिती मिळताच विमानतळावर मोठ्या प्रमाणात अग्निशमन दल तैनात करण्यात आले.

DGCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, बोइंग 777-300ER फ्लाइटच्या एका इंजिनमध्ये तेल गळती झाली होती. त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. तेल गळतीमुळे इंजिन बंद झाले आणि विमान नंतर स्टॉकहोममध्ये उतरविण्यात आले. दरम्यान, विमान अजूनही स्टॉकहोम विमानतळावर असून, तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर विमान रवाना केले जाईल.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा