स्पाइसजेटच्या विमानाचे हैदराबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग; डीजीसीएचे चौकशीचे आदेश

हैदराबाद, १३ ऑक्टोबर २०२२: गोव्याहून येणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर केबिन आणि एव्हिएशन रेग्युलेटरमध्ये धूर दिसल्याने अचानक आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

या घटनेबाबत माहिती देताना डीजीसीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरू आहे. Q400 विमान VT-SQB मधील केबिन आणि एव्हिएशन रेग्युलेटरमध्ये धूर दिसल्याने विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. यामध्ये ८६ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना आपत्कालीन निर्गमन मार्गे खाली नेण्यात आले. विमानातून उतरताना एका प्रवाशाच्या पायावर किरकोळ ओरखडे आले.

दरम्यान, या आपत्कालीन लँडिंगमुळे, एकूण तब्बल नऊ उड्डाणे वळवण्यात आली. यामध्ये सहा देशांतर्गत उड्डाणे, दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि एक मालवाहू उड्डाणाचा समावेश आहे.

दरम्यान, स्पाईसजेटच्या विमानात बसलेल्या एका प्रवाशाने धूराने भरलेल्या केबिनचा फोटो आणि हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करतानाचे दोन व्हिडिओ ट्विट करून त्यांचा अनुभव शेअर केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा