परिवहन विभागाकडून तीस खाजगी प्रवासी बसची तपासणी मोहीम सुरु

नंदुरबार, १३ ऑक्टोबर २०२२: नाशिक येथे खाजगी प्रवासी वाहतूक बसचा जळून अपघात झाला होता. त्यात बारा प्रवाशांचा मृत्यु झाला होता. याअपघाता नंंतर राज्य भरात खाजगी बसची तपासणी मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात देखील ही तपासणी केली जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेत खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसचा परवाना आहे किव्हा नाही. त्यांची कागदपत्रे, व बसला रिफ्लेक्टर, बसमधील अग्निशमन यंत्रना, आपत्कालीन परिस्थितीमधील बाहेर पडण्याचा मार्ग हे सर्व आरटीओ कडून तपासणी करण्यात येत आहे.

तसेच वाहनात काही अनधिकृत बदल करण्यात आला आहे का यांचाही तपास करत आहेत. वाहन चालकाचा वाहन परवाना आहे का, तो बांद तर नाही झाला ना यांची कसून चौखशी करत आहेत. या मध्ये नंदुरबार जिल्ह्यात तीस प्रवासी वाहतूक बसवर कारवाई करण्यात आली आहे‌.

परिवाहन विभागाकडून ही माहिती समोर आली आहे‌. ही मोहीम राज्य भरात राबविली जात आहे. अशी माहीती आरटीओ कडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात अपघाताचे प्रमाण कमी होईल.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर