सुशांतच्या बहिणीची इमोशनल पोस्ट, ‘आता राखी कोणाला बांधू…….!

मुंबई, ३ ऑगस्ट २०२०: १४ जून रोजी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सुशांतसिंग राजपूत याचे निधन झाले. सुशांतच्या अचानक निघून गेलेल्या दु:खापासून त्याचे कुटुंब अद्याप सावरलेले नाही. आज रक्षाबंधन असल्यामुळे सुशांतच्या बहिणीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे आता ती सुशांतला कधीही राखी बांधू शकणार नाही. ही व्यथा व्यक्त करताना सुशांतची बहीण राणी यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

सुशांतच्या बहिणीने काय लिहिले?

गुलशन, माझे बाळ

आज माझा दिवस आहे.

आज तुझा दिवस आहे.

आजचा आपला दिवस आहे.

आज रक्षाबंधन आहे….

३५ वर्षानंतर ही पहिली वेळ आहे जेव्हा पूजाची थाळी सजली गेली. आरतीचा दीपही जळत आहे. हळद-चंदनाचा टीका देखील आहे. मिठाई देखील आहे. राखीही तिथे आहे. फक्त तोच चेहरा समोर नाही ज्याची मी ओवाळणी करून राखी बांधू शकेल… ते कपाळ नाही ज्याच्यावर मी टिळा लावू शकेल. ते मनगट नाही ज्याच्यावर मी राखी बांधू शकेल आणि ती व्यक्ती नाही ज्याचे तोंड मी गोड करू शकेल… तो भाऊ नाही ज्याची मी गळाभेट घेऊ शकेल….

जेव्हा तू होतास तेव्हा जीवन पूर्ण झगमगाटून निघाले होते. जेव्हा तू होता जीवन पूर्ण प्रकाशमान होते. पण, आता तू नाहीस तर मला समजतच नाही की मी काय करू..? तुझ्याशिवाय मी कसं जगू…असा दिवस येईल याची मी कल्पना पण केली नव्हती. …तुझीच राणी दीदी..

सुशांत सिंगच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न बिहार आणि महाराष्ट्र पोलीस करत आहेत. यासंदर्भात तपासणी करण्यासाठी बिहार पोलीस देखील मुंबईमध्ये दाखल झाले आहे. या प्रकरणाची आधीपासूनच तपासणी करत असलेल्या मुंबई पोलिसांवर बिहार पोलिसांनी सहयोग न करण्याचा आरोप केला होता. या प्रकरणावरून बिहार पोलिस आणि महाराष्ट्र पोलीस या दोन्हींमध्ये वाद सुरू आहेत. तर दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सीबीआय कारवाईची मागणी करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा