दिवाळीसाठी मनमोहक आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या जाहिरातींवर भर

पुणे, २५ ऑक्टोबर २०२२ : दिवाळी आणि संवेदना यांचे नाते अतुट आहे. या नात्यांवर आता सिनेमा तर तयार होतोच, पण आता त्याबरोबर जाहिरातीदेखील निघू लागल्या आहेत.

नुकतीच एका कंपनीने वेश्या व्यवसायातील अंधारावर प्रकाश टाकत त्यावर जाहिरात केली. एका वेश्येचे रक्त तपासण्यासाठी कोणीच त्या आवारात येत नसत. एक तरुण डॉक्टर एका मुलीच्या सागंण्यावरुन त्या वेश्येच्या घरी जाऊन तिचे रक्त तपासून दुसऱ्या दिवशी त्याचे रिपोर्टस आणून देतो. तिच्या मनाचा अंधार कायमचा संपवून टाकतो.

एका प्रिंटरच्या जाहिरातीत एका कुंभाराची बायको पणत्या विकायला बसलेली असते. तिची एकही पणती विकली जात नाही. एक लहान मुलगा ते पहातो आणि तिचा फोटो काढतो. त्या फोटोची प्रिंट काढून त्यावर लिहितो की एक दिया खरीदो, अम्मा की दिवाली हॅपी करदो. त्याचे अनेक प्रिंटस लावून ठिकठिकाणी लावतो. त्यामुळे तिचे सगळे दिवे विकले जातात.

त्याचबरोबर ज्वेलर्स अर्थात सोनारांनी अशाच जाहिराती केल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत आहे. हे ही तितकंच खरं. अशा अनेक जाहिराती सध्या प्रेक्षकांचे मन वळवायला नक्कीच उपयुक्त ठरत आहे. शेवटी संवेदना आणि मन खरं. सण हेच तर दाखवतो की मन जुळवा आनंद लुटा.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा