कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कारवाई

मुंबई : ज्या कंपन्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या नियमाची अंमलबजावणी करत नसतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला.
‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास घरुन काम करण्याचं आवाहन केलं आहे.

यावेळी परदेशी म्हणाले की, ज्या कंपन्या निम्म्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगत नाहीत, त्यांच्यावर कलम १८८ अंतर्गत दंडाची कारवाई होऊ शकते. मुंबईला स्टेज ३ मध्ये न्यायचे नसेल, तर काळजी घेणं गरजेचे आहे. थुंकणाऱ्यांवर कायमस्वरुपी अधिक दंड आकारला जाणार आहे.
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयावर भार पडत आहे. खासगी रुग्णालय आणि लॅबनी आपल्याला मदत करण्याचे मान्य केले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्ताचा आकडा ४२ वर गेला आहे. मुंबईत ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा