रोजगाराचे आकडे बदलत आहेत… गेट सेट रेडी…

6

मुंबई, २८ सप्टेंबर, २०२२ : कोविडच्या काळानंतर देशाचे रोजगाराचे आकडे बदलले. कोविडच्या लॉकडाऊन नंतर अनेक लोक बेरोजगार झाले. त्यांच्या नोकऱ्या गेल्या. याच पार्श्वभूमीवर आता भारताची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार २०२२ च्या जानेवरी ते मार्च या काळात रोजगाराचा दर वाढला आहे.
परिवहन, शिक्षण, आरोग्य, हॉटेल क्षेत्र यांक्षेत्रात एक जानेवारी २०२१ रोजी ३.०८ करोड एवढा रोजगार उपलब्ध होता. त्याच रोजगाराचा १ जानेवारी, २०२२ मूल्यांक हा ३.१८ टक्के झाला. एका वर्षात दहा लाख रोजगार वाढले.

महामारीच्या लाटेनंतर आर्थिक क्षेत्रात वृद्धी होण्यास सुरुवात झाली. मागच्या वर्षीपेक्षा यंदा ३८.५ टक्क्यानी वाढ झालेली पहायला मिळत आहे.
यानंतर शिक्षण क्षेत्रात २१.७ टक्के, आय.टी बीपीओ क्षेत्रात १२ टक्के, आरोग्य क्षेत्रात, तर १०.६ टक्के वाढ झाली आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रात एकुणच वाढ पहायला मिळाली आहे. त्यात एकूण १७. ८ टक्के वाढ झाल्याने देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यास नक्कीच मत होईल.

२०२२ च्या वर्षाअखेरीस रोगजार वाढून आर्थिक क्षेत्रात वृदधी होईल. असा विश्वास अर्थक्षेत्रातून व्यक्त केला जातो. सर्वसामान्य नोक-यांमध्ये २८ टक्के वाढ होऊन त्यामुळे भारत देश प्रगतीच्या वाटेवर आणखी पुढे जाईल असा विश्वास याआधीच पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता या वर्षाअखेर भारताचे आर्थिक क्षेत्रातले स्थान नक्कीच उंचावलेले असेल अशी आशा करुयात …

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा