इंग्लंड संघाचा क्रिकेटपटू डेव्हिड विली याची कोरोना चाचणी पॉजीटीव

लंडन, १८ सप्टेंबर २०२०: इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विली याची कोव्हीड १९ चाचणी केली असता ती पॉजीटीव आली आहे. या ३० वर्षीय खेळाडूने गुरुवारी आपल्या सोशल मीडिया वर आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. विली याने इंग्लंड संघासाठी शेवटचा एकदिवसीय सामना आयर्लंड विरुद्ध खेळला होता. विलीने आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले,” आपण केलेल्या संदेशांमुळे धन्यवाद , माझी पत्नी आणि माझी, कोव्हिड १९ चाचणी ही पॉजीटीव आली आहे.

तसेच या खेळाडू ने पुढे म्हटले आहे की, सध्या सुरु असलेल्या टी २० लीग मध्ये त्याला खेळता नाही येणार याचे खूप दुःख होत आहे. यापेक्षा दुःख म्हणजे लक्षणे आढळल्यानंतर मी आणखी तीन खेळाडूंना भेटलो आहे. आणि ते तीन खेळाडू अडचणीत आहेत. तसेच ते पुढील सामने खेळू नाही शकणार .

यॉर्कशायरने या आधी घोषणा केली होती की, विली, टॉम कोहलर कॉडमोर, जोश पोइसडेन आणि मैथ्यू फिशर विटालिट ब्लास्ट ग्रुप येत्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा