इंग्लंडने बनवला इतिहास, 50 षटकात 498 धावा, वनडे विश्वविक्रम

पुणे, 18 जून 2022: इंग्लंड क्रिकेट संघाने नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचलाय. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 498 धावा केल्या, जी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील एका डावातील सर्वोच्च धावसंख्या आहे. अवघ्या चार विकेट्स गमावून इंग्लंडने ही धावसंख्या उभारली, इंग्लंड 500 चा टप्पा पार करेल असं वाटत होतं पण तसे होऊ शकलं नाही.

इंग्लंडसाठी 3 फलंदाजांनी शतकं झळकावली, ज्यात जोस बटलरच्या 162 धावांचा समावेश आहे. जोस बटलरने अवघ्या 70 चेंडूंत 14 चौकार आणि 7 षटकारांसह 162 धावा केल्या. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने केवळ 22 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांसह 66 धावांची खेळी खेळली.

इंग्लंडची फलंदाजी

• जेसन रॉय – 1 धाव, 7 चेंडू
• फिल सॉल्ट – 122 धावा, 93 चेंडू, 14 चौकार, 3 षटकार
• डेव्हिड मलान – 125 धावा, 109 चेंडू, 9 चौकार, 3 षटकार
• जोस बटलर – 162 धावा, 70 चेंडू, 7 चौकार, 14 षटकार
• इऑन मॉर्गन – 0 धावा, 1 चेंडू
• लियाम लिव्हिंगस्टोन – 66 धावा, 22 चेंडू, 6 चौकार, 6 षटकार

या डावात इंग्लंडने किती धुवाधार खेळी केली याचा अंदाज या डावात एकूण 26 षटकार मारले गेले आहेत, तर 36 चौकार आहेत यावरून येतो. ज्या फलंदाजांनी धावा केल्या आहेत, प्रत्येकाचा स्ट्राईक रेट 100 च्या वर गेला आहे.

एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

इंग्लंडने या सामन्यात 498 धावा करून इतिहास रचला आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या केली. विशेष म्हणजे याआधीचे दोन मोठे स्कोअरही इंग्लंडच्या नावावर आहेत. म्हणजेच वनडे क्रिकेटच्या इतिहासातील तीन सर्वात मोठ्या धावा इंग्लंडच्या नावावर आहेत.

•   इंग्लंड – 498/4 वि. नेदरलँड, 17-06-2022
•   इंग्लंड – 481/6 वि ऑस्ट्रेलिया, 19-06-2018
• इंग्लंड – 444/3 वि पाकिस्तान, 30-08-2006

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा