इंग्लंड की पाकिस्तान? कोण ठरणार विश्वचषक २०२२ चा विजेता?

पुणे ,१३ नोव्हेंबर २०२२ : आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना आज पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. आजचा सामना हा दुपारी दीड वाजता मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर खेळवला जाणार आहे. आजच्या या महामुकाबल्यासाठी क्रिकेट च्याहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाचं वातावरण आहे.

या वर्ल्डकप मध्ये पाकिस्ताने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर इंग्लंडने भारताचा पराभव करत फायनल मध्ये तिकीट मिळवलं.

पाकिस्तान आणि इंग्लंड आतापर्यंत टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये २६ वेळा आमने-सामने आले आहेत यामध्ये इंग्लंड संघाने २६ पैकी १६ सामन्यांत विजय नोंदवला आहे. तर पाकिस्तानला फक्त १० सामन्यांत विजय मिळवता आलाय.

दरम्यान आजच्या सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मेलबर्न मध्ये आज ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर आज पावसामुळे आजचा सामना नाही झाला. तर सामन्यासाठी राखीव दिवस ही ठेवण्यात आला आहे. म्हणजेच १३ नोव्हेंबरला पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही. तर १४ नोव्हेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे. जर राखीव दिवशीही सामना पूर्ण होऊ शकला नाही. तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषित केलं जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा