नागपूर, ८ ऑगस्ट २०२४ : बांगलादेश मुद्यावर आज संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे क्षेत्र मंत्री श्री. गोविंदजी शेंडे यांनी सांगितले की, आपला शेजारी देश, बांगलादेश सध्या हिंसा आणि अराजकतेने ग्रासला आहे. तेथील. पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडून गेल्यानंतर अराजकतावादी अधिक प्रबळ झाले असून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कुचकामी झाली आहे. या गोंधळाच्या परिस्थितीत तेथील अतिरेकी जिहादी घटकांनी हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू केले आहेत. बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळे, व्यापारी प्रतिष्ठाने आणि घरांचे नुकसान झाले आहे. हे भयंकर कृत्य बांगलादेशातील प्रत्येक जिल्ह्यात घडत असल्याची माहिती गोविंद शेंडे यांनी दिलीय.
शेंडे पुढे म्हणाले की, कट्टरवाद्यांच्या निशाण्यापासून स्मशानभूमीही सुटलेली नाही. मंदिरांचे मोठे नुकसान झाले आहे. बांगलादेशात क्वचितच असा कोणताही जिल्हा शिल्लक असेल जो त्यांच्या हिंसाचाराचे आणि दहशतीचे लक्ष्य बनला नसेल. वेळोवेळी होणाऱ्या अशा दंगलींचाच हा परिणाम आहे की फाळणीच्या वेळी बांगलादेशातील हिंदूंची संख्या ३२ % होती, ती आता ८% पेक्षा कमी आहे आणि ते सतत जिहादी अत्याचाराला बळी पडत आहेत. विश्व हिंदू परिषदेद्वारे असे सांगण्यात आले आहे की, बांगलादेशात हिंदूंची घरे, दुकाने, कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, महिला, मुले आणि अगदी त्यांच्या श्रध्दा आणि आस्थेचे केंद्र असलेली मंदिरे, देखील सुरक्षित नाहीत. तेथील पीडित अल्पसंख्याक हिंदूंची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांसाठी प्रभावी कारवाई करणे ही जागतिक समुदायाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
शेंडे म्हणाले की, या परिस्थितीत भारत नक्कीच दुर्लक्ष करू शकत नाही. जगभरातील शोषित आणि विस्थापित लोकांना मदत करणे ही आपली परंपरा राहिली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. बिकट परिस्थितीचा फायदा घेत जिहादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. याबाबत सावध राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षा दलांनी सीमेवर कडक नजर ठेवणे आणि कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ न देणे आवश्यक आहे. बांगलादेशात लवकरात लवकर लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकार पुन्हा प्रस्थापित व्हावे अशी विश्व हिंदू परिषदेची इच्छा आहे. तेथील अल्पसंख्याक समाजाला मानवी हक्क मिळायला हवेत आणि बांगलादेशच्या आर्थिक प्रगतीत कोणताही अडथळा येऊ नये. आहेत. भारतातील हिंदू समाज आणि सरकार या परिस्थितीत बांगलादेशच्या सोबत या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष सुदर्शन शेंडे, विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे प्रामुख्याने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : वृषभ फरकूंडे