मुंबई, ३० मार्च २०२३:- हिंदी चित्रपट सृष्टीतील ॲक्शन हिरो अजय देवगन याने दृश्यम २ च्या घवघवीत यशानंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक म्हणजेच ‘भोला’ हा चित्रपट रामनवमीच्या निमित्ताने आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर बघूनच त्यातील ॲक्शन सीन्स मुळे प्रेक्षक खूप उत्सुक होते. याच उत्सुकतेचा पुरावा आज चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळाला. ॲक्शन सिनेमांची आवड असलेल्या प्रत्येक चाहत्यासाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणीच म्हणायला हवी. यामधील स्टंट्स,सिक्वेल्स त्याचबरोबर रोमान्स आणि कॉमेडी यामुळे चित्रपट पैसा वसूल आहे अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाल्या आहेत.
१९ मार्चपासूनच बोला चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंग ला सुरुवात झाली नंतर दोन-तीन तासातच आयमॅक्स आणि ४ डी एक्स वर्जन सह संपूर्ण देशात हजर राहून जास्त तिकिटे विकली गेली. त्यामुळे प्रेक्षकांनी ॲडव्हान्स बुकिंग द्वारे चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच शुभेच्छा आणि प्रेम दिले आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री तब्बू यांनी त्यांच्या समाज माध्यमांद्वारे चित्रपटाचे प्रमोशन केले. या चित्रपटाआधी अजय देवगणने तीन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटाची कथा एका गुन्हेगाराभोवती फिरते.एक असा गुन्हेगार जो पोलीस आणि ड्रग माफिया यांच्यात अडकलेला असतो.
या चित्रपटाचे अजून एक आकर्षण म्हणजे ‘भोला’ चित्रपटांमध्ये आमला पॉल ही साउथची प्रसिद्ध अभिनेत्री तमिळ आणि मल्याळम चित्रपटांनंतर पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये काम करणार आहे.भोला चित्रपट हा कैथी चित्रपटाचा जरी रिमेक असला तरीही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी निर्मात्यांनी यात बदल केला आहे. या चित्रपटात अजय देवगन भोला म्हणजेच एका कैदी माणसाचे माणसाची भूमिका साकारत आहे तर तब्बू पोलीस अधिकारी डायना जोसेफ या भूमिकेत आहे. या चित्रपटात दीपक डोब्रियाल आणि गजराज राव यांच्यासह चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अमला पॉल आणि अभिषेक बच्चन देखील दिसणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे.