भारतात कोरोनाच्या नविन स्ट्रेन ची एन्ट्री, सहा लोकांमध्ये आढळली लक्षणे

नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०२०: नवीन वर्षाच्या उत्सवापूर्वी कोरोनाबद्दल चिंता वाढली आहे. भारतात नवीन कोरोना विषाणूची एकूण ६ प्रकरणे आढळली आहेत. मंगळवारी भारत सरकारने ही माहिती दिली. युनायटेड किंगडमहून परत आलेल्या ६ लोकांमध्ये हे नवीन स्ट्रेन सापडले आहेत. त्यापैकी बेंगळुरू, २ हैदराबाद आणि पुण्यातील एक अश्या तीन प्रयोगशाळांच्या चाचणी केलेल्या नमुन्यांमध्ये नवीन स्ट्रेन सापडला आहे.

ब्रिटनहून परत आलेल्या लोकांची जीनोम स्केविंग केले गेले होते, याचा अहवाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या विभागांनी याबाबत चाचणी घेतली होती.

कुठे सापडले आहेत हे नवीन स्ट्रेन ची लक्षणे

मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या दरम्यान युके वरून आलेल्या तब्बल एकूण ३३ हजार लोकांना ट्रेस केले गेले. तसेच त्यांची चाचणी देखील घेण्यात आली. ह्यापैकी एकूण ११४ लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते.

यानंतर या सर्व पॉझिटिव लोकांचे नमुने देशातील १० लॅब मध्ये (कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टिम बेंगलुरू, निमहंस बेंगलुरू, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली) पाठवण्यात आले होते.

यामधील ६ लोकांच्या नमुन्यांमध्ये कोरोनाव्हायरस चा नवीन स्ट्रेन निदर्शनास आला आहे. राज्य सरकारतर्फे या सर्व लोकांना सेल्फ-क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्याशी संपर्क साधणार्‍या लोकांना अलग ठेवण्यात आले आहे, तर इतर प्रवाश्यांची माहिती घेण्यात येत आहे.

महत्त्वाचं म्हणजे ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोना व्हायरसचा हा नवीन प्रकार ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहे. यामुळेच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, लस विकसित करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे की, ह्या नवीन स्ट्रेन मुळे त्यांच्या उत्पादनावर किंवा लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही.

भारताने रद्द केली होती उड्डाणे

२३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात यूकेकडून येणाऱ्या सर्व उडाणांवर बंदी घालण्यात आली होती. यूकेहून परत आलेल्या लोकांची आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात येत आहेत, त्यानंतर त्यांच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेंसींग चाचणी घेतली जात आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी माहिती मिळाल्यानंतरच नॅशनल टास्क फोर्सने एक मोठी बैठक घेतली आणि तयारीचा आढावा घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा