माढा, दि. २३ ऑगस्ट २०२०: कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात “महिला तक्रार निवारण कक्ष” स्थापन करा, अशी अँड. हरिचंद्र कांबळे यांनी मागणी केली.
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये व कुर्डूवाडी शहरात महिलांवर होणार्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून घरगुती त्रास देखील वाढला असल्याने कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात महिला तक्रार निवारण कक्ष हा स्वतंत्र स्थापन करावा. अशी मागणी अँड हरिश्चंद्र कांबळे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
स्वतंत्र महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्याने समुपदेशन देखील करता येईल. त्यामुळे महिलांचा वेळ व पैसा देखील वाचेल व लवकर महिलांना न्याय मिळेल असेही अँड हरिश्चंद्र कांबळे यांनी सांगितले.आपल्या मागणीला जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचे अँड हरिश्चंद्र कांबळे यांनी यावेळी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील