कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा : आरोग्यमंत्री

औरंगाबाद, दि.१३मे २०२०: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार पसरू नये यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वसमावेशक ‘टास्क फोर्स’ची स्थापना करुन सुक्ष्म नियोजनाव्दारे रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवावे.
जिल्ह्यातील प्रशासन समन्वयाने काम करत असून प्रशासनाच्या या कामात लोकप्रतिनिधी , सामाजिक कार्येकर्ते आणि सामान्य जनता यांचे सहकार्य दखील तितकेच महत्वाचे आहे. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग जोमाने काम करत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनी यांच्यासमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, सतीष चव्हाण, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलिस अघीक्षक मोक्षदा पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन बैठक पार पडली.

बैठकीच्या सुरूवातीला खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील परिस्थितीची माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली. घाटीमध्ये केवळ कोविड बाधित रुग्णांवरच उपचार करण्यात यावेत तसेच जिल्ह्यातील खाजगी लॅबला तपासणीसाठी परवानगी देण्यात यावी असे त्यांनी मत मांडले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा