पुणे, १८ ऑक्टोबर २०२०: आज समाजासाठी नेतृत्व करणारे अनेक आहेत. पण त्यातच प्रामाणिक आणि सचोटीने नेतृत्व करणारे फार कमी आहेत. त्याचबरोबर आता नेतृत्व करणारे लोकांच्या गरजांकडे पाठ फिरवून नेतृत्व करण्याचा देखावा करतात. नेतृत्व की हुकूमशाही? असा प्रश्न आज सर्वाना पडलाय. मग हे चित्र बदलायला आता आपण तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा हे ही खरं. प्रस्थापित नेते एखाद्या समाजाच्या समस्यांकडे पाठ फिरवतात, दुर्लक्ष करतात. मग दुर्लक्षित समाजाची दखल घ्यायला भाग पाडण्यासाठी हाच तरुण वर्ग पुढे सरसावतो आणि आपल्या समाजाचं नेतृत्व करतो. या जुन्या नेतृत्वाखाली काही साध्य होणार नसेल तर तरुणांनी नेतृत्व करणं चुकीचं आहे असं म्हणणं मूर्खपणाचं लक्षणं आहे.
आज प्रस्थापित नेतृत्व असणारे लोक फक्त सत्तेसाठी आणि मोठेपणा करण्यासाठीच आपलं नेतृत्व करतायत. अशा लोकांच्या सत्तेला धक्का देण्याची ताकद तरुण नेतृत्वात आहे याला दुमत नाही. जर प्रत्येक तरुण आपल्या समाजासाठी झटला, अथवा तसं नेतृत्व केलं तर हे नवं नेतृत्व देशाला महासत्ता बनवू शकेल यात शंका नाही.
निवडणुका म्हणजे फक्त ‘राज’कारण नव्हे तर ‘समाज’कारण आहे हे मुलांना कळणं आवश्यक आहे. मुलांमध्ये राजकारणाची गोडी निर्माण होणं आवश्यक आहे. आज देशाला ‘तरुण’ नेत्यांचीच गरज आहे आणि अशाच निवडणुकांमधून आपल्याला हे तरुण नेतृत्व मिळू शकेल. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वच समस्या दूर होतील असं नाही. पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त समस्यांना वाचा फुटेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते मार्गी लावण्यासाठी निवडणूका होण गरजेचे आहे, असे मत भाजप युवा मोर्चा शिवाजीनगर मतदारसंघाचे चिटणीस सुमित जाधव यांनी मांडले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड