बीजिंग, २० ऑक्टोबर २०२०: तिसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) चीनची अर्थव्यवस्था ४.९ टक्क्यांनी वाढली. जगातील कोरोना काळामध्ये वाढणारी ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे. कोरोनाच्या परिणामामुळे भारतासह अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. जून तिमाहीत भारताचा जीडीपी २३.९ टक्क्यांनी घसरला. ४ दशकात प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेत इतकी घसरण झाली.
तिसऱ्या तिमाहीत ४.९ टक्के वाढीसह, चीनची अर्थव्यवस्था पुन्हा कोविडपूर्व स्थितीच्या जवळ आहे. तथापि, जुलै-सप्टेंबरमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर अपेक्षेपेक्षा किंचित कमी होता. ब्यूरो ऑफ स्टेटसटिक (एनबीएस) च्या आकडेवारीवरून ही माहिती घेण्यात आली आहे. चीन जगातील दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तर या नंतर अमेरिकेची अर्थव्यवस्था मोठी आहे.
एनबीएसने म्हटले आहे की आताही आंतरराष्ट्रीय वातावरण खूपच गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे भविष्यात अनिश्चिततेची भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या मते, चीन ही जगातील एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे जी या वर्षी वाढ दर्शवित आहे. जगातील उर्वरित प्रमुख अर्थव्यवस्था कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे व लॉकडाऊनच्या परिणामामुळे त्रस्त आहेत.
एएफपीच्या विश्लेषकांनी तिसऱ्या तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेत ५.२ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज वर्तविला होता. दुसर्या तिमाहीत चिनी अर्थव्यवस्थेमध्ये ३.२ टक्क्यांनी वाढ झाली. चीनमध्ये कोरोना विषाणू प्रथम निदर्शनास आला आणि इथूनच तो पूर्ण जगभर पसरला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे