अखेर शाळा भरल्या,पण मुंबईची शाळा बंदच…..

10

मुंबई, २७ जानेवारी २०२१: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून शाळा, काॅलेजच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता कोरोनाचा जोर ओसरत आसला तरी शैक्षणिक वर्षाला पुर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ जाऊ शकतो आणि याच परिस्थितीवरून राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत.

महाराष्ट्रातील शाळा २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी पर्यंत सुरू होणार आहेत. आता पहीली ते चौथी पर्यंतचे वर्ग कधी सुरू होणार? यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा विचार करू. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी पर्यंत शाळा २३ तारखेपासून नियमावली सह सुरु केल्या. विद्यार्थ्यांनी पुस्तके स्वताची स्वताहा हातळावी, पुर्ण काळजी घ्यावी”असे त्या म्हणाल्या.

मुंबईची शाळा राहणार बंदच…..

एकीकडे पाचवी आणि नववी चे वर्ग आजपासून सुरू होत आहेत.तर मुंबईतील शाळा बंदच राहणार आसल्याचे समजते आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सध्यातरी शाळा सुरू करता येणार नसल्याचे म्हटलं आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका पाहता हे करता येणार नाही. असे पालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मात्र या सर्व परिस्थितीत पालक आणि विद्यार्थांच्या गोंधळात भर पडली असून,मुलांना शाळेत पाठवायचे कि नाही या बाबत एक संभ्रम निर्माण झाले आहे. तर आता येणार्या वर्षात विद्यार्थ्यांचे पाठ्यक्रम कश्या पद्धतीने हाताळावेत या साठी सरकारचा कस लागणार असल्याचे दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव