गोल पोस्ट महाराष्ट्र दर रविवारचा जनता कर्फ्यू अखेर रद्द

दर रविवारचा जनता कर्फ्यू अखेर रद्द

उस्मानाबाद, २३ ऑक्टोबर २०२०: वाढत्या कोरोनाच्या प्रादूर्भावाकडे गांभीर्याने लक्ष देत उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू असायचा. मात्र, आता हा जनता कर्फ्यू रद्द करण्यात आलेला आहे.

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाउनचा कालावधी हा ३१ ऑक्टोबर आहे. तरी, आज दिनांक २३ ऑक्टोबर २०२० रोजी आलेल्या नविन आदेशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी असणारा जनता कर्फ्यू हा रद्द करण्यात आलेला आहे. तसेच, या आदेशांची अंमलबजावणी ही आज दिनांक २३ ऑक्टोबर २०२० पासून लागू करण्यात येत आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version