गोल पोस्ट गुन्हा बंद घर फोडून चोरट्याने एक लक्ष रुपयावर मारला डल्ला

बंद घर फोडून चोरट्याने एक लक्ष रुपयावर मारला डल्ला

पुरंदर, २३ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथे बंद असलेले घर फोडून चोरट्याने एक लक्ष रुपयाची चोरी केली आहे. याबाबतची तक्रार सासवड पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोडीत बुद्रुक येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे किराणा मालाचा व्यापार करणारे प्रशांत महादेव बडदे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे वडील मुंबईला आले होते .यादरम्यान त्यांनी जिल्हा बॅंकेतून एक लक्ष रुपये रक्कम काढून घरातील लोखंडी कपाटात ठेवली होती. ते मुंबई इथे आल्यानंतर दिनांक २२ रोजी त्यांचा चुलत भाऊ ईश्वर बदडे यांनी घराचे दार उघडे असल्याचे फोन करून कळविले. यानंतर त्यांनी गावी घरी जाऊन पाहिले असता घराचे सेप्टीडोअर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडण्याचे पाहिले. तसेच घरातील लोखंडी कपाट ही तोडलेले त्यांना आढळून आले. या कपाटात ठेवलेले एक लक्ष रुपये चोरीला गेल्याचे त्यांना आढळुन आले. यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार सासवड पोलिसांत दिली आहे.

याबाबतचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version