कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक: आ. संजय जगताप

पुरंदर, दि. ३० जून २०२०: कोरोनेला रोखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्याचबरोबर इतरांची देखील काळजी घेतली पाहिजे. असे आवाहन पुरंदरचे आ.संजय जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

पुरंदर तालुक्यात कोरोना बरोबरच राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढताना वाढताना दिसतायेत. पुरंदर तालुक्यातील विरोधी पक्षांकडून पुरंदरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असताना आमदार संजयजगताप कुठे आहेत? अशा प्रकारचे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत कोरोनाला रोखण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असून सर्वांनीच आपल्या जबाबदार्‍या पूर्ण पाडाव्यात, कोरोना आजार हा लोकांच्या निष्काळजीपणामुळे पसरतोय. शासनाने तीन महीने कोणती काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन केले आहे.

गेली तीन महिने प्रशासन आणि आपण सर्वजण कोरोनाशी लढा देत आहोत. मात्र लॉक डाऊन उठल्यानंतर लोकांचे पुण्याला येणे जाणे वाढले आणि यातील काही लोक कोरोना पॉझिटिव निघाले. त्यांच्या संपर्कात आलेले काही लोक कोरोना पाॅजिटीव्ह निघाले. या लोकांनी काळजी घेतली असती तर ही वेळ आली नसती आणि त्या भागात हा आजार पसरला नसता. आम्ही वेळोवेळी सांगतोय की, लोकांनी काळजी घ्यायला हवी. मात्र लोक काळजी घेताना दिसत नाहीत.

सासवडमध्ये ३१ रुग्ण आहेत. त्यापैकी मुळ सात रुग्ण हे पुणे किंवा मुंबईवरून आलेले रुग्ण आहेत. त्यामुळे इतरांना हा आजार झाला. या परिस्थितीत आपण काळजी घेतली म्हणून कोरोनाचा जास्त प्रसार झाला नाही. आपण कोरोना पसरू नये म्हणून सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. असं जर केलं नाही तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.

लोकांनी सोशल डिस्टन्स पाळणे,नियमीतपणे मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे,नोकरी किंवा कामा निमित्ताने बाहेर जाणा-या लोकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कंपन्यांनीही नियमांचं पालन करणे गरजेचे आहे. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणे किंवा एकमेकांवर टीका टिप्पणी करणे हे योग्य नाही.लोकांची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पुरंदरचे प्रशासन अत्यंत सक्षमपणे काम करत असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसवण्या पेक्षा लोकांना मदतीसाठी पुढे या असे म्हणत विरोधकांना त्यांनी अनुल्लेखानेच मारले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा