माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंग यांचं निधन 

नवी दिल्ली, २७ सप्टेंबर २०२०: देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सकाळी ट्विट करत ही माहिती दिली. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली 

”जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.” असं ट्विट करत संरक्षण मंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक 

जसवंत सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला. जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, ”जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.” दरम्यान जसवंत सिंग यांच्या निधनानंतर देशभरातून दुःख व्यक्त केलं जात असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा