माजी सैनिक मेजर शहाजी मदणे यांचा कर्जत नगरपंचायतीच्या वतीने सन्मान

20

कर्जत, दि. २० जून २०२०: कोरोना चा प्रादुर्भाव हा संपुर्ण देशात पाहण्यास मिळत आहे. या काळात माजी सैनिक संघटनेच्या वतीने नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकी जपत काम केल्याचे पाहण्यास मिळाले आहे.

या परिस्थितीत ही घरी असलेले माजी सैनिक हे आपल्याला रस्त्यावर उतरलेले पाहण्यास मिळत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वताःचा जीव धोक्यात घालून कोरोना योध्या म्हणून चे काम करणारे कर्जत चे मेजर शहाजी मदने हे लक्षात येताच त्यांचा कामांची दखल घेत त्यांचा सन्मान आज दिनांक २० रोजी कर्जत नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव यांनी केला.

या वेळी सन्मान मुर्ती मेजर शहाजी मदने कर्जत नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव, माजी सैनिक संघटनेचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ हे उपस्थित होते. अशा मोजक्याच मान्यवर उपस्थित हा सन्मान देण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष