नवी दिल्ली, ६ जानेवारी २०२१: फेसबुकच्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपले अटी व गोपनीयता धोरण (टर्म अँड काँडिशन्स) अद्यतनित केले असून मंगळवारी संध्याकाळपासून याची अधिसूचना हळूहळू भारतातील वापरकर्त्यांना दिली जात आहे. व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना नवीन धोरण स्वीकारण्यासाठी फेब्रुवारी २०२१ पर्यंत वेळ दिली आहे. तोपर्यंत वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप च्या नवीन टर्म अँड काँडिशन्सला एक्सेप्ट करावे लागेल अन्यथा आपले अकाउंट डिलीट करावे लागेल.
आपले खाते सुरू ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना नवीन टर्म अँड काँडिशन्स स्वीकारावे लागेल. यासाठी वापरकर्त्यांना कोणताही पर्याय मिळणार नाही. परंतु, ‘नाॅट नाऊ’ हा पर्यायही येथे दिसत आहे. म्हणजेच, आपण काही काळ नवीन धोरण स्वीकारत नसाल तर आपले व्हॉट्सअॅप अकाउंट चालू राहील.
नवीन पॉलिसी मध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटीग्रेशन अधिक आहे आणि आता फेसबुककडे वापरकर्त्यांचा डेटा पूर्वीपेक्षा जास्त असेल. यापूर्वीही व्हॉट्सअॅपचा डेटा फेसबुकवर शेअर केला जात होता. पण फेसबुकने व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचे इंटीग्रेशन अधिक होईल, हे आता स्पष्टपणे सांगितले आहे.
व्हॉट्सअॅपच्या अद्ययावत पॉलिसी नुसार आपण कंपनीला देत असलेल्या परवान्यात काही गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्यात नमूद केले आहे की, आमच्या सेवा वापरण्यासाठी आपण व्हॉट्सअॅप वर जे कंटेंट तुम्ही अपलोड करता, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसीव करता त्यांना यूज, रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरात नॉन-एक्सक्लूसिव, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रांसफरेबल लाइसेंस दिले जातात. यामध्ये असेही लिहिले आहे की, या परवान्याद्वारे आपण दिलेला हक्क आमच्या सेवा ऑपरेट करणे आणि प्रदान करण्याच्या मर्यादित उद्देशाने आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे