सोनं आणि म्युचअल फंड यांचं साटे-लोटे

मुंबई, १० ऑगस्ट, २०२२: आयुष्याची साठवण म्हणजे आयुष्याची कमाई. पण काळानुरुप या कमाईचे स्वरुप बदलत गेले. ज्यात पूर्वी सोने या धातूला अनमोल मानले जात होते. आता त्याच सोन्याला म्युचअल फंडमध्ये बदलण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. सध्या ६० टक्के गुंतवणूक ही म्युचअल फंडची असून त्यातून मिळणारा परतावा हा चांगल्या आणि सशक्त प्रकारातला आहे. पण या हायब्रिड गुंतवणुकीला सध्या मार्केटमध्ये ७.७ टक्के मार्क दिले जात आहेत. पण यातही आता म्युचअल फंडला जास्त भाव आल्याने सोन्याचे दर स्थिर आहेत. एका पिढिचा पाठिंबा हा सोन्याला तर एका पिढीचा पाठिंबा हा म्युचअल फंडला दिसत आहे.

नोटबंदीनंतर आणि आताच्या महागाईच्या, असुरक्षित जगात डिजिटायझेशनला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातही बिट कॉईन यांसारख्या योजना पुढे आल्या. पण ज्या यशस्वी झाल्या नाहीत. ज्यावर आता शेअर मार्केट आणि म्युचअल फंडवर भर दिला जात आहे. मात्र ज्यात शिस्त आणि म्युचअल फंडच्या दरांकडे लक्ष ठेवणे हे महत्त्वाचे आहे. पण त्याचबरोबर म्युचअल फंडमध्ये सगळ्यात जास्त पेशन्स हा महत्त्वाचा गुण तुम्ही सांभाळला पाहिजे. असे मत कोटक महेंद्र बॅंकेचे संचालक नितेश शहा यांनी व्यक्त केले.

म्युचअल फंडात सध्या इक्विटी फंड जोरात आहे. पण त्यातही जुलै महिन्यात इक्विटी फंडाचा दर कमी झाला. ४६८२ ते २८१० पर्यंत हा दर खाली आला होता. कोटक महेंद्र बँकेने नुकताच एक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जाहीर केला. तर मागच्या महिन्यात आरबीआय बँकेने ५.४० टक्क्यांनी महागाई दर वाढवले. या दरम्यान आता लोकांचा कल पुन्हा एकदा म्युचअल फंडकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे सोने आता केवळ दागिन्यांपुरते राहून गुंतवणुकीसाठी म्युचअल फंड समोर येत आहे, असे चित्र आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा