Online Liquor Permit Application Maharashtra: जिल्ह्यात मद्यसेवन परवाना काढणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळणारे हे परवाने आता ऑनलाइन उपलब्ध झाल्याने इच्छुकांना घरबसल्या अर्ज करण्याची सोय झाली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचत असून, परवाना काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. यापूर्वी परवाना काढण्यासाठी एक्साइज विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागत होते. मात्र, आता exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नागरिक कायमस्वरूपी, एक वर्षासाठी, एक महिन्यासाठी किंवा एक दिवसासाठी परवाना काढू शकतात.
एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्ह्याभरात १०८२ मद्यप्रेमींनी परवाने घेतले आहेत. यामध्ये २१४ कायमस्वरूपी परवाने, १६८ एक वर्षासाठीचे परवाने, तर देशी आणि विदेशी मद्यसेवनासाठी एक दिवसाचे तब्बल एक लाख परवाने देण्यात आले आहेत.
परवान्यासाठी शुल्क खालीलप्रमाणे आहे;
- कायमस्वरूपी परवाना: ₹१०००
- एक वर्षाचा परवाना: ₹१००
- एक दिवसाचा देशी मद्य परवाना: ₹२
- एक दिवसाचा विदेशी मद्य परवाना: ₹५
- ऑनलाइन सुविधेमुळे परवाना काढणे सोपे झाले असले तरी, मद्यसेवन हे आरोग्यासाठी हानिकारक असून,
ते जबाबदारीने करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे














































