कार्यकारी अभियंता जयंत सरवदे यांचे कोरोनाने निधन

12

पुणे, १ ऑगस्ट २०२० : पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत सरवदे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

जयंत सरोदे यांचा पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यांना रक्तदाब व मधुमेहचाही त्रास असल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

महापालिकेने एक चांगला अधिकारी गमावल्याची खंत त्यांच्या निकटवरतीयांनी बोलून दाखवली.

न्यूज अनकट प्रतिनिधी