दिल्ली ७ जुलै २०२१: केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज विस्तार होणार असून कोणाला खुर्ची मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, डॉ.हीना गावित, भारती पवार दिल्लीत पोहोचले असून अनेक जण दिल्लीत पोहोचले आहे. या शपथविधीदरम्यान अनेक तर्क-वितर्क केले जात आहे. नारायण राणेयांच्याबरोबर भागवत कराड, रणजित नाईक-निंबाळकर हेदेखील दिल्लीत पोहोचले. यांचा समावेश निश्चित आहे का? असा प्रश्न आहे. या नावांची चर्चा नक्कीच आहे. अमित शाह, जे.पी. नड्डा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
पंतप्रधान यांच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या असून कुणाच्या हातची सूत्रे जाणार हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल. संध्याकाळी सहा वाजता हा शपथविधी होणार आहे. एकूण २२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. या मंत्रीमंडळात तरुण चेह-याला संधी देणार असल्याची कुजबूज सुरू आहे. अनेक मंत्र्याचा भार कमी करुन नवीन लोकांनी ही घौडदौड सुर ठेवावी या हेतूने हा विस्तार महत्त्वाचा ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस