सोशल मीडियावरून चुकीचा प्रचार करणे पडणार महागात: पोलिसांचा इशारा

पुरंदर, ११ जानेवारी २०२१: निवडणूक प्रचारादरम्यान सामाजिक माध्यमातून तसेच व्हाट्सअप ग्रुप वर चुकीची माहिती टाकून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवरसायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करणे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडणार असल्याचे दिसते आहे.

पुरंदर तालुक्यातील बऱ्याच गावात ग्रामपंचायत निवडणुक दिनांक १५ जानेवारी रोजी होत आहेत. त्याबाबतची आचारसंहिता मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने लागू झालेली आहे. निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामध्ये व्हाट्सअप, फेसबुक या सारख्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे.

अनेक लोक जातीजातीमध्ये किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल तसेच उमेदवार यांच्यामध्ये वाद निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट टाकला जात आहेत. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्यास ग्रुपचा ऍडमिन व ती पोस्ट टाकणारा व्यक्ती या दोघांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिला आहे.त्याच बरोबर सामाजिक माध्यमावर नजर ठेवण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा