अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेट प्रोटोटाइप मध्ये विस्फोट

टेक्सास, दि. ३० मे २०२०: शुक्रवारी चाचणी दरम्यान अमेरिकन कंपनी स्पेसएक्सचा स्टारशिप रॉकेट प्रोटोटाइप मध्ये विस्फोट झाला. हि एका वर्षातील चौथी वेळ आहे जेव्हा स्पेसएक्सचा स्टारशिप प्रोटोटाइप अपघाताला बळी पडला आहे.

स्पेसएक्स ही पहिली खासगी कंपनी आहे ज्या कंपनीचे फालकन नाइन रॉकेट मानवांना अंतरिक्ष मध्ये पाठवत आहे.

स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटमधील अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठविण्यात येणार आहे. असुरक्षित हवामानामुळे लाँच २७ मे रोजी रद्द करण्यात आली. फाल्कन ९ लाँच करण्याचा प्रयत्न ३० मे रोजी फ्लोरिडाच्या स्पेस सेंटरवरून पुन्हा केला जाईल.

त्याचवेळी शुक्रवारी स्टारशिप रॉकेटच्या प्रोटोटाइप चाचणी दरम्यान हा अपघात झाला. अमेरिकेच्या टेक्सास शहरात त्याची चाचणी घेण्यात येत होती. इंजिन सुरू केल्यावर धूर बाहेर आला आणि मग त्याचा स्फोट झाला.

स्पेसएक्स कंपनीला स्टारशिप रॉकेटकडून जास्त अपेक्षा आहेत. या रॉकेटची लांबी ३९४ फूट आहे. याला पुढच्या पिढीचे रॉकेट असेही म्हटले जात आहे. स्टारशिपच्या माध्यमातून चंद्र आणि मंगळावर मानवांना पाठवणे आणि १०० टन कार्गो पुरवण्याची कंपनीची योजना आहे.

स्पेसएक्सचे चीफ एलोन मस्कची अशी योजना आहे की स्टारशिप रॉकेटच्या माध्यमातून अवकाश प्रवास स्वस्त करता येईल. स्टारशिप रॉकेट्स एकापेक्षा जास्त वेळा वापरले जाऊ शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा