दिल्लीमधे इस्त्राईलच्या दुतवासासमोर स्फोट, एनआयए टीम दाखल

नवी दिल्ली, २९ जानेवारी २०२१: दिल्लीमधे स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. इस्त्राईलच्या दिल्लीतल्या दुतवासासमोर आयईडी ब्लास्ट झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये  चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले असून  सायंकाळी पावने सहा च्या सुमारास  अज्ञात फोनवरून ब्लास्टची माहिती अग्निशमन दलाच्या विभागाला देण्यात  आली होती. तर यामधे सुदैवाने  कोणीही जखमी झाली नाही. मात्र सरकार कडून अजूनही कोणतीच ब्लास्टची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
कृषी कायद्यावरून शेतकरी सध्या दिल्ली मधे आंदोलन करत आहेत. ज्यामधे हा कृषी कायदा मागे घेण्याची मागणी केंद् सरकार कडे होत आहे.तसेच शेतकरी  आपल्या मागणीला घेऊन आजूनही ठाम आहेत. तर दिल्ली मधे गेल्या आठवड्याभरापासून परिस्थिती तणावपूर्ण आहे.
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि त्यांनी आपला मोर्चा लाल किल्ल्यावर वळवत तिथे झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. या हिंसकते मधे दगड, तलवारींचा वापर करण्यात आला होता. तर अनेक पोलिसकर्मी जखमी झाले होते.
या आंदोलनाच्या हिंसकते नंतर आज दिल्लीत स्फोट  झाल्याने दिल्लीतील वातावरण आणखी चिघळले आहे. दरम्यान सींघु बॉर्डर वर देखील पोलीस आणि शेतकऱ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झालेला पाहण्यास मिळाला. यावेळी दगडेक देखील करण्यात आली. त्यामुळे देशात परिस्थिती तणावपूर्ण राहू  नये म्हणून सरकारने इंटरनेट सेवा काही वेळे साठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या ब्लास्ट मुळे दिल्ली पुन्हा एकदा हदरली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा