लुधियाना न्यायालयाच्या इमारतीत स्फोट, 1 ठार – 4 जखमी, NIA-NSG तपासासाठी दाखल

लुधियाना, 24 डिसेंबर 2021: पंजाबच्या लुधियाना कोर्टात बॉम्बस्फोट झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसते की, जो व्यक्ती मारला गेला आहे तो बॉम्ब लावत होता आणि याच दरम्यान स्फोट झाला.

दरम्यान, सुरुवातीला एजन्सी आणि पोलिसांना कट असल्याचा संशय आहे. आतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आयईडी स्फोट असावा असा पोलिसांना संशय आहे. सुरुवातीला स्फोटात मृत झाला तोच संशयित असावा, असे बोलले जात आहे. बॉम्ब वॉशरूममध्ये असेंबल करण्याचा प्रयत्न केला असता तो स्फोट झाला असावा, असा संशय आहे. फॉरेन्सिक तपास करून पुढील तपास केला जाईल.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनीही कोर्टात हा स्फोट कट असल्याचे म्हटले आहे. चन्नी म्हणाले, ‘निवडणूक जवळ आली असताना काही देशद्रोही शक्तींकडून अशी घृणास्पद कृत्ये केली जात आहेत, त्या प्रसंगाचा आढावा घेण्यासाठी मी लुधियानाला जात आहे. याबाबत सरकार जागरूक असून, लोकांनीही जागृत राहावे.

तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी हे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी हे केले जात असल्याचे ते म्हणाले.

NIA-NSG तपासासाठी पोहोचले

लुधियाना कोर्टात झालेल्या स्फोटानंतर एनआयए आणि एनएसजीला तपासासाठी तिथे पाठवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएची दोन टीम लुधियानाला जात आहेत. त्याचवेळी एनएसजीची एक टीम लुधियानाला जाणार आहे. नॅशनल बॉम्ब डेटा सेंटरची टीमही लुधियानाला पाठवली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा