अभाविप पुणे महानगर यांच्या वतीने मोठ्याप्रमाणात सेवा कार्य

4

पुणे, २६ एप्रिल २०२०: संपूर्ण जग कोरोना प्रादुर्भावाच्या विळख्यात असल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहत आहेत. त्यातच संचारबंदी असल्या कारणाने अनेक लोक आपल्या घरापासून दूर अडकून पडले आहेत. तसेच पुणे शहरात अन्य राज्यातून व अन्य शहरातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी आणि कामानिमित्त आलेले नागरिक अडकून पडले आहेत. सर्व मेस व हॉटेल बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे हाल होत आहेत.

ह्या सर्व प्रश्नांवर उत्तर म्हणून अभाविप पुणे महानगराच्या वतीने आत्ता पर्यंत एकूण ५४० अन्न धान्याचे किट वाटप केले आहे. ह्या किटचा फायदा सरासरी १४२२ लोकांना होईल. ह्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. ह्या उपक्रमामुळे नॉर्थ इस्ट राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात मदत झाली आहे. मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री मा. एन. बिरेन सिंग, आरोग्यमंत्री मा. लंगपोकलकपम जयंतकुमार सिंग आणि समाजकल्याण मंत्री मा. नेमाचा किपगेन यांनी ट्विटर वरून अभाविप पुणे महानगराच्या वतीने चालू असलेल्या उपक्रमामुळे मणिपूर राज्यातुन पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना खूप मदत होत आहे असे मत व्यक्त केले आहे व अभाविप पुणे महानगराचे अभिनंदन केले आहे.

आम्ही विद्यार्थी हितासाठी सदैव कटिबद्ध आहोत व आम्ही शक्य तेवढ्या जास्ती जास्त विद्यार्थ्यांना नक्की मदत करू. हे आमचे कर्तव्य व जबाबदारी आहे असे मत पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच जास्तीजास्त लोकांनी ह्या उपक्रमास मदत करावी व मदतीसाठी
जनता सहकारी बँक, कर्वेनगर शाखा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (MDS)
बचत खाते क्र. 0312 2010 00 32261
IFSC Code: JSBP 0000 031
MICR Code: 411074009. या खात्यांवर मदत करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा