यावर्षी पडणार कडाक्याची थंडी, हिवाळा वाढण्याची देखील शक्यता

नवी दिल्ली, २ ऑक्टोंबर २०२०: देशाच्या उत्तरेकडील भागातील डोंगराळ आणि मैदानावरून मान्सूनची औपचारिकपणे परती झाल्यापासून हिवाळ्याची सुरूवात झालीय. येत्या हिवाळी हंगामात कडाक्याची थंडी असंल तर हिवाळ्याचा हंगाम आणखी जास्त राहील, असा अंदाज आहे. हवेतील घटती आर्द्रता, वेगानं वाहणारे वारे आणि मोकळं आकाश यामुळं थंडीची सुरुवात होण्याची चाहूल लागते आणि ती सुरू होण्याची चाहूल जाणवू देखील लागली आहे.

मान्सूनच्या परतीमुळं आकाश पूर्ण रिकामं झालंय. तसच सूर्याच्या निखळ उन्हामुळं हवेतील आर्द्रता देखील कमी होत चाललीय. परंतु, रात्रीच्या तापमानात घसरण होत आहे. हीच ती लक्षणं आहे ज्यामुळं हिवाळ्याची सुरुवात झाली असल्याचं सांगितलं जातं. हवामानशास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की १५ ऑक्टोबरपासून दिवसाचे तापमानही कमी होईल, त्यानंतर हिवाळ्याची औपचारिक सुरुवात होईल.

यंदा हिवाळा लांबण्याची शक्यता

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ जी.पी. शर्मा यांचं म्हणणं आहे की, वाऱ्यामध्ये बदल होत चाललाय. कमी दाबाचं क्षेत्र असलेल्या उत्तरेकडील भागांमध्ये उच्च दाब निर्माण झाल्यामुळं आता वाऱ्यांची दिशा देखील बदलली आहे. काल रात्री पासून कोरडे वारे वाहण्यास सुरुवात झालीय. स्कायमेट वेदर सर्व्हिस’शी संबंधित असलेल्या शर्मा यांनी यावेळी ‘ला नीना’ ची परिस्थिती निर्माण केली जात असल्याचं स्पष्ट केलं. यामुळं, जो अनुमान आहे की यावेळी जी थंडी कडाक्याची असणार आहे त्यात आता ही थंडी दीर्घकाळ देखील पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळंच यंदाचा मान्सून देखील काही भागांमध्ये नेहमीच्या अनुमाना पेक्षा जास्त पडलाय. परंतु अल नीना परिस्थितीत याउलट होत असतं.

या राज्यातून मान्सूनची परती

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेश या उत्तरेकडील पर्वतीय राज्यांमधून मान्सून परतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा