झारखंडमध्ये एकतर्फी प्रेमात तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; एका तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

झारखंड, २९ ऑगस्ट २०२२: झारखडमधील दुमका येथे बारावीत शिकणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला शाहरूख नावाच्या तरुणाने एकतर्फी प्रेमात अयशस्वी झाल्याने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे‌. घटनेनंतर पीडितेला रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मात्र, तरुणी ९० टक्के भाजल्यामुळे उपचारादरम्याण तिचा मृत्यु झाला. या घटनेनंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. संजीव सिंग यांची १९ वर्षीय मुलगी अंकिता हिला रात्री उशिरा झोपेत असताना खिडकीतून पेट्रोल टाकून पेटवून दीले आहे.

अंकिताच्या मृत्युनंतर विश्र्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने घोषणाबाजी करत दोषीला फासीची मागणी केली आहे. परिसरात वाढता तणाव लक्षात घेता दुमका शहरात सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अंबर लडका यांनी दिली आहे.

पोलीसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. लवकरच त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळेल अशी माहीती पोलिसांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा