मुंबई, ५ ऑगस्ट २०२० : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या केलेल्या मुंबई पोलिसांच्या टिकेवर आता चांगलाच वाद उफाळून येत असल्याचे दिसत आहे. तर अमृता यांनी आणखी एक पोस्ट ट्विटरवर शेयर केली.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीसांच्या मुंबई पोलिसांवर केलेल्या टिकेचे सडेतोड उत्तर देत, “मागील ५ वर्षात फडणवीसांनी पोलिसांची स्तुती केली, पोलिसांच्या मागे ठामपणे उभे रहिले. तर आत्ता खुर्ची गेली म्हणुन त्यांना असुरक्षित वाटत आहे. तर त्यांनी राज्य सोडून जावे हा पर्याय आहे.” अशी परखड टिका केली.
अमृता फडणवीस पुन्हा बरळल्या…..
अमृता फडणवीस यांच्या या पोस्ट मधून ठाकरे सरकावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येवरुन त्या नकळत ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसल्या….
“रेहते हे शीश महलो में जो, अवाम से दुरी बनाया करते हे!, हम तो वो शख्स है, जो पत्थर के घर बनाया करते है!, भूल गए है वो खुद काँच के घर में रह कर खुद छुपाए छुपता कुछ नहीं! हम फरेबियो के ठोकरों में ओर सच को सीने से लगाया करते है!
अशा पद्धतीचे त्यांनी ट्विट केले आहे. तर त्यांच्या या ट्विटवर समिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत. तर संजय राऊत यांची पोस्ट ताईंनी मनाला जास्तच लावून घेतली की काय? असा सवाल नेटकरी करताना दिसत आहेत. तर संपुर्ण राजकरणाच्या इतिहासात सत्ता गेल्या नंतर पहिल्यादांचा एका माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी या अशा पद्धतीने टिका करताना पहायला मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी














































