फडणवीस- कटुता संपवा आणि कामाला लागा…

38

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२२: आजच्या सामना वर्तमानपत्रात फडणवीसांना चक्क चांगलं व्यक्तीमत्त्व म्हणून संबोधलं आहे. आज चक्क उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या कटुता संपवूया आणि कामाला लागूया, या आशयाला दुजोरा दिला आहे.

दिवाळीच्या काळात उपमुख्यमंत्र्यांनी कटुता संपवा आणि कामाला लागा असे सांगितले. यावर आता उद्धव ठाकरेंनी चक्क या वाक्याला दुजोरा दिला. पण त्याचवेळी त्यांनी शिंदे गटाला त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या विषाला बासुंदीची उपमा दिल्याचा अचाट प्रयत्न होत आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर तोफ डागली आहे.

पण त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे मात्र कौतुक केले. फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा समोपचाराचा असून सत्ता गेल्यामुळे ते बिघडले आहे, असंही त्यांनी सामनामध्ये नमूद केलं आहे.

पण हे सांगताना त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. राज्याच्या राजकारणात सूडाचे विषारी प्रवाह वहात असून त्याचं मूळ भाजपच्या राजकारणात असल्याचं त्यानी अग्रलेखात सांगितलं. राजकारणात व्यक्तिगत चिखलफेकीसाठी भाजपने काही भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं आहे. तर भाजपने सत्तेचा गैरवापर करुन सरकार पाडले अशा आशयात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

सध्या उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या कलानं घेत आहेत का… की आणखी काहीतरी शिजणार आहे… असा सवाल या निमित्ताने समोर आला आहे, हे मात्र खरं…

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस