एकाच दिवसात ७५ प्रकरणांची सूनावणी घेत न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाची कमगिरी

नवी दिल्ली, १ ऑक्टोबर २०२२: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने शुक्रवारी १० तास ४० मिनटांत ७५ प्रकरणांची सुनावणी घेतली आहे. सामान्यपणे न्यायालयाचे कामकाज हे सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत संपते, मात्र शुक्रवार नंतर शनिवार आणि रविवार सुट्टी व नंंतर पुन्हा दुर्गापुजा आणि विजयादशमीच्या सुट्टी आहे.

न्यायालयाचे कामकाज चार ते पाच दिवस होणार नव्हते. त्यामुळे दोन्ही न्यायमुर्तींच्या खंडपीठासमोर विजयादशमीच्या सुट्टी अगोदर रात्री रहा वाजेपर्यंत सुनावणी घेतली आहे. या दरम्यान त्यांनी ७५ प्रकरणांची सुनावणी घेतली आहे. त्यांच्या खंडपीठाची सलग १० तास ४० मिनिटे सुनावणी चालू होती.

याच वर्षी जुलैमध्ये, विद्यमान मुख्य न्यायाधीश उदय लळित यांनी सकाळी ९.३० वाजता प्रायोगिक तत्वावर त्यांच्या न्यायालयात सुचीबद्ध प्रकरणांची सुनावणी सुरु केली आहे. त्यावेळेस त्यांनी असे सांगितले होते की, मुले सकाळी सात वाजता तयार होऊन शाळेत जाऊ शकतात, तर मग आपण लवकर न्यायालयात का येऊ शकत नाही?

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा