जपान, १२ ऑक्टोबर २०२० : “मी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर काम करणारा अंतराळवीर आहे”, असे सांगून एका व्यक्तीने योमिउरी शिंबुन नावाच्या महिलेला लुटले. जपानी महिलेसोबात घडलेली ही घटना खूपच धक्कादायक आहे. या व्यक्तीने आपली ओळख करुन देतानाच तो अंतराळवीर असल्याचे सांगितले.
योमिउरी शिंबुन हिची इंस्टाग्रामद्वारे त्या बनावट अंतराळवीराशी ओळख झाली. त्याच्या प्रोफाइलवर स्पेस वरील काही फोटोज होते जे पाहून ती महिला प्रभावित झाली.
या दोघांचे बोलणे सुरू झाले. लाईन नावाच्या जपानी ॲप वर हे संवाद साधू लागले. तेव्हाच त्या व्यक्तीने महिलेला तो तिच्या प्रेमात पडल्याचे सांगितले अणि त्याने लग्नाची मागणी घातली. लग्नानंतर जपान मधे नवीन आयुष्य सुरु करण्याचे आश्वासन दिले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून पृथ्वीवर परत येण्यासाठी त्याला रॉकेट फी भरावी लागेल, ज्या नंतरच तो जपान ला पोहोचेल असे त्याने महीलेला सांगितले.
तिने २४.८ लाख दिल्यानंतर देखील हा पुरुष सतत पैशाची मागणी करत राहिला. त्यातूनच महिलेला संशय आला आणि तिने पोलिसात जाऊन तक्रार केली. पोलिस ह्या केस ला ‘इंटरनॅशनल रोमान्स स्कॅम’ असे मानत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: केतकी कालेकर