गावी जाण्यासाठी कामगारांना दिली जातायेत बोगस प्रमाणपत्र

पुणे, दि. ५ मे २०२० : काही दिवसांपूर्वी पुण्यात अडकून पडलेल्या परराज्यातील, पर जिल्ह्यातील मजुरांना, विद्यार्थ्यांना व इतर नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने मार्ग मोकळा करून दिला आहे. मात्र त्यासाठी शासनाकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत.

या अटींमध्ये महत्वाची अट म्हणजे बाहेर गावी जाऊ इच्छित असलेल्या व्यक्तीने स्वतःची मेडिकल टेस्ट करून घेऊन त्याचे प्रमाणपत्र कागदासोबत जोडणे गरजेचे आहे. यासाठी कोणत्याही एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मात्र, राज्यातील अनेक भागात रुग्णांची तपासणी न करताच प्रमाणपत्र दिले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक ठिकाणी प्रमाणपत्र देतांना ठराविक रक्कम घेऊन हे दिले जात आहे. त्यामुळे कोरोनाबाबत सरकार ज्या काळजीने ही जबाबदारी पार पडताना दिसत आहे, या प्रकारामुळे त्या आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेला हरताळ फासण्याचा प्रकार समोर येत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी हे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांचा बोगसपणा यातून समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यात असा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात असा प्रकार किती ठिकाणी होत असेल याची कल्पना न केलेली बरी.
अशा बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना सरकारने वेळीच चाप लावणे गरजेचे आहे. आपल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. नाही तर कोरोनाचा फैलाव रोखणे अशक्य होणार आहे. असे काही जाणकारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ” न्यूज अनकट” शी बोलताना ही माहिती दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा