नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक हिंसक आंदोलने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे.
देशातील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने हिंसक आंदोलनाला आळा घाला. तसेच फेक न्यूज आणि सोशल मीडियावरील अफवा त्वरीत रोखा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालायने सर्व राज्यांना दिल्या आहेत.
सोशल मीडियावरील अफवांमुळेच राज्यांमध्ये आंदोलनं सुरू असल्याचंही केंद्राचं म्हणणं आहे. काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचं नुकसानही करण्यात आलं आहे.
केंद्राने राज्यांना काही सूचना जारी करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत.