फेक ट्विटर अकाऊंटचा तेंडुलकर कुटुंबाला त्रास

मुंबई : सचिन तेंडूलकर यांच्या सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडूलकर यांची ट्वीटरवर अकाऊंट असून हे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे तेंडुलकरची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यामुळेच तेंडुलकरने ट्विटर इंडियाकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
बुधवारी केलेली पोस्ट ही ट्विटर इंडियाचे टेंशन वाढवणारी होती. त्यानं थेट ट्विटर इंडियाला अ‍ॅक्शन घेण्याची विनंती या पोस्टमधून केली.

सारा, अर्जुन यांच्या अकाऊंटवरून विविध राजकीय पोस्टही केल्या गेल्या आणि त्याच्याशी माझ्या कुटुंबातील कोणाचाही काडीमात्र संबंध नाही, असं तेंडुलकरने स्पष्ट केले आहे. अर्जुन आणि सारा यांचे ट्विटरवर अकाऊंट नसल्याचे सांगत त्यानं ट्विटर इंडियाकडे फेक अकाऊंट बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्याने पोस्ट केली की,”मला हे स्पष्ट करायचे आहे की, माझा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांचे ट्विटरवर अकाऊंट नाही. अर्जुनच्या नावानं जे अकाऊंट आहे, ते बनावट आहे आणि त्याच्यावरून जाणीवपुर्वक वाद निर्माण होईल, असे ट्विट केले गेले आहे. ट्विटर इंडियाला माझी विनंती आहे, की त्यांनी यावर कारवाई करावी.”

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा