फळा आणि खडू

61

फळा आणि खडू
लागलेत रडू …
विचारत आहत प्रश्न
शळा कधी सुरु..?

छमछम छडीचा
नाही राहिला धाक …
ढीगभर सुट्ट्या आणि
परीक्षाही माफ

digital फळ्यावर .
online शाळा
google वर हजेरी
youtube चा लळा …

Mobile च्या Screen वर
मैदान गाजत आहेत …
Pub-g तल्या बंदुका
रातभर वाजत आहेत

आता वाजेल का घंटा
शिजेल का सुकडी ..?
लक्षात तरी राहिल का
इयत्ता आणि तुकडी ..?

_तेजस सुभाष पाटील