कोलकत्ता, ७ मार्च २०२१: सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिथुन यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी कलकत्ता मधील ब्रिगेड परेड ग्राउंड मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या रॅली च्या मंचावर बीजेपी चा झेंडा हाती घेतला. पश्चिम बंगाल भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले की, हिंदी आणि बंगाल चित्रपटांमधील सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपासाठी निवडणुकीदरम्यान प्रचार करणार आहेत.
वास्तविक भाजपाला प्रचारासाठी या मोठ्या चेहरा ची आवश्यकता होती, ती आज मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रवेशानंतर पूर्ण झाली आहे. डावे पक्षांच्या मंचावर नेहमी दिसणारे मिथुन चक्रवर्ती यांनी आज अचानक भगवा झेंडा हाती घेतल्यामुळे हा एक मोठा न्यूटन मानला जात आहे.
येत्या काळात बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये चांगलीच रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कलकत्त्यामध्ये पहिली रॅली होणार आहे. मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबत चर्चा आधीपासूनच रंगल्या होत्या. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या भेटीनंतर या चर्चांना चांगलेच उधाण उठले होते.
कैलाश विजयवर्गीय बनले सूत्रधार
मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये येण्यासाठी विजयवर्गीय यांचे खास प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी ते सातत्याने सक्रिय देखील होते. गेल्या शनिवारी रात्री विजयवर्गीय यांनी मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली होती. यासंदर्भात त्यांनी फिट करून बराच काळ मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत चर्चा झाल्याचे तसेच देशभक्ती वरील त्यांच्याशी निगडीत अनेक किस्से देखील समजल्याचे त्यांनी सांगितले होते.
मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी राजकारणाशी नाते हे काही नवीन नाही. ममता बॅनर्जी यांनी त्यांना टी एम सी मधून राज्यसभेत पाठवले होते. मात्र, यातून मिथुन चक्रवर्ती काही काळातच बाहेर पडले होते. पण आता पुन्हा एकदा ते राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे