प्रसिद्ध लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन

मुंबई, दि.२१ मे २०२०: कोरोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले प्रसिद्ध लोककलावंत छगन चौगुले (वय ८१) याचे मुंबई येथील रुग्णालयात निधन झाले.

छगन चौगुले यांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. खंडेरायच्या लग्नात बानू नवरी नटली या त्यांच्या गाण्याने महाराष्ट्राला त्यांची ओळख करून दिली.

‘मांढरदेवी काळुबाईची कथा’, ‘आईचा गोंधळ’, ‘कथा खंडोबाची’ हे त्यांचे अल्बम प्रसिद्ध होते.

चौगुले हे गोंधळी होते. मात्र त्यांनी आपली कला गोंधळाच्या कार्यक्रमांपुरता मर्यादीत न ठेवता त्यांनी ती कला विकसित केली. त्यांच्या निधनानंतर संवेदना व्यक्त करताना ‘महाराष्ट्राने एक हाडाचा लोककलावंत गमावला अशी प्रतिक्रिया लोक रसिकांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा