प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे हृदयविकाराने निधन

पुणे :  पुण्यातील प्रसिद्ध गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योजक सम्राट मोझे यांचे  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते. पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले.

२८ एप्रिल २०२० ला त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मात्र त्यांना मंगळवारी (दि.५) रात्री छातीत अचानक त्रास होऊ लागल्याने एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सम्राट हे माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे ते पुतणे होत. सम्राट यांची अंगावर सोन्याचे दागिने घालण्याची स्टाईल वेगळी होती. सुमारे १० ते १२ किलो सोने ते अंगावर घालत असत. त्यामुळे त्यांना गोल्डन मॅन, असे नाव पडले होते. सम्राट हे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असायचे. माध्यमांमध्येही त्यांचीच चर्चाच असायची.

त्यांच्या निधनाने संगमवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून आपली बदनामी केली होत असल्याची सम्राट मोझे यांनी पोलीस सायबर सेलला तक्रार दिली होती. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. सम्राट काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये स्थायिक झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांच्यामागे आई ,पत्नी ,व दोन लहान मुले असा परिवार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा